Mon. Sep 27th, 2021

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने खडसेंनाही समन्स बजावलं आहे. पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती. मात्र एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.

मी ईडीला चौकशीसाठी सहकार्य करणार असून आतापर्यंत ५ वेळा माझी चौकशी झाली. तसेच ही चौकशी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत खडसे मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा होती. मात्र त्याअगोदरच त्यांची प्रकृती ढासळली असल्याने आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली.

भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर काही तासांतच एकनाथ खडसे यांनासुद्धा ईडीने समन्स बजावलं. या समन्सच्या माध्यमातून खडसे यांना सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. परंतु त्या अगोदरच खडसेंची प्रकृती बिघडली. मात्र तरीही खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *