Sun. Oct 17th, 2021

‘त्या’ राष्ट्रवादी नेत्याच्या खुनाचा उलगडा

सांगलीच्या खटाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा खुन झाल्याचा प्रकार घडला आठ दिवसांपूर्वी घडला होता. राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला झाला असून त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेचे गु्न्हेगार मोकाट फिरत होते. गेेले अनेक दिवस सांगली पोलीस या प्रकरणाचा तपास करत होती. मात्र आता या प्रकरणाला पुर्णविराम लागला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या हत्या प्रकरणाचा 8 दिवसांनंतर छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे.

आनंदराव पाटील यांच्या हत्या प्रकरणी चार आरोपींना सांगली पोलिसांनी अटक केली आहे. सुपारी देऊन खटावचे राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वैयक्तिक वादातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

खटावचे राष्ट्रवादी नेते आनंदराव पाटील यांची हत्या करण्यासाठी 40 लाखाची सुपारी देण्यात आली होती असे समोर आले आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने अखेर आठव्या दिवशी आनंदराव पाटील यांच्या हल्लेखोरांना पकडले आहे.

वैयक्तिक कारणातून ही हत्या झाली असून अरविंद पाटील आणि लक्ष्मण मडीवाल यांनी पुण्याच्या अतुल जाधव आणि दत्तात्रय जाधव या दोघांना आनंदराव पाटील यांच्या हत्येसाठी 40 लाखाची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

सुरवातीला राजकीय वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात होते मात्र आरोपी सापडल्यानंतर हा खून गावातील वैयक्तिक वादातून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा खून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *