Wed. Jul 28th, 2021

शरद पवारांची किमया ; उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकत्र

निवडणुका तोंडावर आल्याने राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील चव्हाट्यावर असणारा वाद मिटणार की जास्तचं बळावणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

मात्र या दोन राजेंमधील वाद संपवून त्यांना एकत्र आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यश आले आहे.तब्बल चार तासाच्या बैठकीनंतर हा वाद मिटला आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली असून, या बैठकीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे हे देखील उपस्थित होते.

शरद पवार यांच्यासह अजित पवार, दिलीप वळसे पाटील, खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रराजे गणेश नाईक, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यासारखे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

सातारा लोकसभेच्या जागेसाठी शरद पवार यांनी अखेर विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

दोन्ही राजेंमधील वाद मिटला की राव?

आमच्यात फार वाद नसून जे वाद होते ते थोडे फार राहणारचं पण शरद पवार यांना शिवेंद्रराजे भेटले नव्हते तर कार्यकर्ते भेटले होते.

काही गैरसमज दोघांच्यात झाले होते त्याला शिवेंद्रराजे किंवा मी जबाबदार नाही, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

एवढेच नाही तर आता आम्हाला दोघांना कार्यकर्त्यांनाही समजवावे लागेल असं हि ते म्हणाले आहेत.

आम्ही एकत्र काम करायचं असं ठरवलेलं आहे अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केली आहे.

उदयनराजेबरोबरील वाद मिटण्याचे संकेत खुद्द शिवेंद्रराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिले होते.

मला फक्त आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभेची तयारी करत आहे असं ही शिवेंद्रराजे म्हणाले होते.

तर आमची दोन घराणी नाहीत, छत्रपतींचं घराणं एकच आहे, असं म्हणत त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनीही तसे संकेत दिले आहे.

गेल्या महिन्यात दोन्ही शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांनी एकाच गाडीत प्रवास केला होता. तेव्हा त्यांच्यातील वाद मिटल्याची चर्चा साताऱ्यात होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *