Mon. Jul 22nd, 2019

‘शौर्य कोणी दाखवले आणि छाती कोण बडवतो’ – शरद पवार

404Shares

कष्ट कोणी केले, शौर्य कोणी दाखवले आणि छाती कोण बडवतो’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदी त्यांच्यावर टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा लॉन्स येथे नाशिक लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या ‘कार्यकर्ता संवाद’ या मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांवर सडकून टिका केली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांनी पुलवामा हल्यानंतर लष्काराने केलेल्या कामांचे कौतुक केले. पण, भाजपवर जोरदार टिका केली.

देशावर कोणी हल्ला केला, तर मतभेद विसरून सगळे एकत्र येतात. यावेळीही सर्व एकत्र आले. पण, भाजप त्यातून राजकीय फायदा घेत आहे.

लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान आणि यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना पाकिस्तान हल्ला करण्याच्या तयारीत होता.

यशवंतराव चव्हाण यांनी पाकिस्तानवर हल्ला करण्याचा आदेश सैन्याला दिला. त्यामुळे पाकिस्तानला पहिला धक्का बसला हा धक्का महाराष्ट्राच्या सुपुत्राने व जवानांनी दिला, असेही त्यांनी सांगितले.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पाकिस्तानचे दोन भाग केले. त्यांनी इतिहास नाही तर भूगोल बदलला. पण, हे आता छाती बडवायला लागले, असे ते म्हणाले.

भारत कोणाच्या वाट्याला जात नाही, पण कोणी वाट्याला आला तर सोडत नाही. भारतीय सैन्यामुळे जगात प्रतिष्ठा वाढली असेही ते म्हणाले.

दरम्यान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ही यावेऴी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे.

जगातील प्रराक्रमी सैन्य आपल्या देशाला लाभले आहे. स्वातंत्र्य काळापासूनच सैनिकांनी आपले शौर्य दाखविले.असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण खात्याला अधिक बळकटी दिली. या अगोदर अनेक लढायला झाल्या, मात्र त्याचा पक्षीय राजकारणासाठी कधीही वापर केला गेला नाही.

मोदी सैन्याचे राजकीयीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

404Shares

Leave a Reply

%d bloggers like this: