Jaimaharashtra news

शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा ; ‘या’ आमदारासह 4 जणांना अटक

शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळयाप्रकरणी आमदारासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

आमदार अनिल भोसले यांच्यासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदचे आमदार आहेत. सूर्याजी जाधव, कैलास भोसले आणि तानाजी पडवळ असे अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.

मंगळवारी मध्यरात्री ही अटक करण्यात आली. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही अटक केली आहे.

यासंदर्भात हाय कोर्टने आदेश दिले होते की, गैरव्यवहार झालं असल्याचं सांगितलं. दरम्यान आदेशानंतरही 4-5 महिने अटक होत नव्हती.

या बॅंकेत अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. ठेवीदारांनी कोर्टाचे दार देखील ठोठावले होते. ठेवीदारांनी वेळोवेळी आंदोलनं देखील केली होती.

आमदारांनी 71 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

आज दुपारी या सर्वांना जिल्हा न्यायालयात दाखल केले जाणार आहे.

Exit mobile version