Wed. Jun 16th, 2021

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सगळे पक्ष लागले कामाला

काँग्रेस यावेळी स्वबळावर निवडणूक लढवणार

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भारतीय जनता यांच्यात चांगलचं टक्कर होणार आहे. महापालिकेवर भगवा फडकणारच यावरून शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे आणि यामुळे चांगलच राजकारण तापलं आहे.

काँग्रेस यावेळी स्वबळावर निवडणूक लढवणार हे स्पष्ट केलं आहे. कारण २०१७च्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचं मोठं नुकसान झाले होते. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनंही देखील कंबर कसली आहे.

राष्ट्रवादी पक्ष आणखी कसा मजबूत बनले यावर शरद पवार आणि बाकी नेते लक्ष देत आहे. कोरोना संकटाच्या काळात वांद्रे कुर्ला संकुलात सक्रिय कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात ८ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना संकट असल्यानं सध्या मेळाव कार्यक्रम घेता येत नाहीत. पूर्णपणे अनलॉक झाल्यावर मेळावे, कार्यक्रम घेता येतील,’ असं नबाब मलिक यांनी सांगितलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून अद्याप कोणाचीही निवड झालेली नाही. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी निवडणूकीत लक्ष घातले तर राष्ट्रवादी या पक्षाला फायदा होईल असं राजकीय वर्तुळात गोष्टी रंगतांना दिसत आहे. नवाब मल्लिक यांनी म्हटलं, ‘राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आहे. हे तीन पक्ष सरकारमध्ये एकत्र आहेत. मात्र काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारमध्ये एकत्र असलेल्या पक्षांनी एकसंध राहायला हवं, असं विधान मलिक यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *