मराठी मुस्लिम-गैर मराठी मुस्लिम सर्टिफिकेट देण्याची गरज नाही – नवाब मलिक

मुंबईत आज रविवारी मनसेचा महामोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणावर मनसैनिक सामील झाले होते. दरम्यान राज ठाकरेंनी आझाद मैदानावर भाषण केले.
याभाषणावेळी राज ठाकरेंनी जशास तसं उत्तर देणार असल्याचं म्हटलं. या भाषणावरुन मंत्री नवाब मलिक यांनी राज ठाकरेंना धारेवर धरलं आहे.
कोणालाही मराठी आणि गैरमराठी मुस्लिम असं सर्टिफिकेट देण्याची गरज नसल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत.
मुस्लिम-गैर मुस्लिम सर्टिफिकेट देण्याची गरज नाही
महाराष्ट्रात जन्माला आलेले मराठी मुस्लिमच आहेत. आणि यांना मराठी आणि गैरमराठी असे सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, असंही नवाब मलिक म्हणाले.
देशात धर्माच्या, भाषेच्या नावाने काही जणं राजकारण करत आहेत.
पण यांनी आपल्या होर्डिंगवर भारत माझा देश आहे. सर्व भारतीय माझे बांधव आहेत, असं सांगितलं आहे. तर हे लोकं भाषेच्या आधारावर कोणाला मारणार नाहीत, अशी मला अपेक्षा असल्याचं नवाब मलिक म्हणाले.
कोणत्या पक्षाने काय भूमिका घ्यावी हा त्या पक्षाचा विषय आहे. राज्यात शांतता आहे. शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न करु नये. राज्य कायद्याने चालणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले होते ?
जिथे मराठी मुसलमान राहतात तिथे दंगली होत नाही. बाहेरून आलेले मुस्लिम येतात त्या ठिकाणी गैरप्रकार होतात, असं राज ठाकरे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले होते.
जशास तसे उत्तर देणार
आज आम्ही मोर्च्याला मोर्चाने उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल, असे राज ठाकरे म्हणाले.
तसेच देशामध्ये एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर नवाब मलिका यांनी वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र कायद्याचं राज्य असल्याचं नवाब मलिक म्हणाले.
काय म्हणाले नवाब मलिक ?
दगडाला दगडाने आणि तलवारीने उत्तर देऊ, असं बोलणाऱ्यांनी महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. अशी तंबी राज ठाकरे यांना दिली आहे. या राज्यात शांतिप्रिय लोकं राहतात.
हिंसा करण्याची भाषा असेल तर, आम्ही गांधीवादी असून हे राज्यात खपवून घेणार नाही, असं नवाब मलिका म्हणाले. याबाबतीत मलिक यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
जे सांगतात की लोकांना सीएए आणि एनआरसी काही कळत नाही. मला वाटतं मोर्चा काढणाऱ्या लोकांनाही कळत नाही, असं म्हणत नवाब मलिक यांनी मनसेला टोला लगावला.
बांगलादेशी २ कोटी आहेत,ही भाषा भाजपने आसाममध्ये केली. परंतु आकडेवारी वेगळीच होती. आकडेवारीनुसार आसाममध्ये १९ लाखमध्ये १६ लाख हिंदु आणि ३ लाख मुस्लिम आहेत. अशी आकडेफेक करणं योग्य नाही, असंही नवाब मलिक म्हणाले.
इतर देशातील लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु असते. न्यायालयात त्यांना हाजीर केलं जातं. न्यायालयाच्या माध्यमातून निर्णय घेतला जातो.
पण जे लोकं सांगतात तलवारीनी उत्तर देऊ. महाराष्ट्रात शांतीप्रिय लोकं राहतात. हिंसा करण्याची भाषा असेल तर आम्ही गांधीवादी असून हे राज्यात खपवून घेणार नसल्याचं मलिक म्हणाले.