Jaimaharashtra news

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सिद्धार्थ बनसोडे याला अटक केली आहे. रत्नागिरीतील पावस इथून त्याला त्याच्या तीन साथीदारांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अण्णा बनसोडे यांच्यावर १२ मे रोजी गोळीबार झाला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी तानाजी पवार याने सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारावर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तानाजी पवार यांच्या कंपनीकडून आमदार पुत्रावर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

अखेर सिद्धार्थ बनसोडे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सिद्धार्थ बनसोडे अटक होत नसल्यामुळे आयुक्त कृष्णप्रकाश आणि पोलिसांवर सर्वच थरातून टीका होत होती. १५ दिवसानंतर पोलिसांना सिद्धार्थ बनसोडेला अटक करण्यात यश आले आहे.

Exit mobile version