Fri. Oct 7th, 2022

वेदांतावर राष्ट्रवादीचे आंदोलन

युवासेनेतर्फे राज्यभरात वेदांता प्रकरणी स्वाक्षरी मोहीम सुरु आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला पळवून लावणाऱ्या खोके सरकारचा निषेध.. असा आशय असलेल्या बॅनर्सवर तरुणांकडून स्वाक्षऱ्या केल्या जात आहेत.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेण्यावरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. मुंबईत गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केले आहे. तर, पुण्यातही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक आंदोलन केले आहे. मुंबईत मंत्रालयाकडे जात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. तर पुण्यातही सुप्रिया सुळेंनी राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. महाराष्ट्रात वेदांतापेक्षा चांगला प्रकल्प आणायचं आश्वासन देताय पण आम्हाला हाच प्रकल्प पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला लॉलीपॉप दिला म्हणून पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेस लॉलीपॉप आंदोलन करत आहे.  हे आंदोलनामुळे राजकारणात काय नवीन बदल घडणार आहे? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

कशा प्रकारे आंदोलन कऱण्यात आले पाहुयात

1 thought on “वेदांतावर राष्ट्रवादीचे आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.