Fri. Mar 5th, 2021

माढा मतदारसंघातून शरद पवार निवडणुक लढणार ?

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेस नेते छगन भुजबळ आणि माढाचे खासदार विजयसिंह मोहिते- पाटील उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पावर यांनी निवडणुक लढावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामुळे माढा विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते- पाटील यांना या जागेवरुन निवडणुक लढता येणार नसल्याने विजयसिंह मोहिते- पाटील यांचे समर्थक नाराज झाले आहेत.

शरद पवार यांचे म्हणणे काय ?

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांनी निवडणुक लढवावी असे माढा विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते- पाटील आणि स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे.

या आग्रहामुळे निवडणुक लढण्याचा विचार करेेन, असे शरद पवार म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *