राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंची मदत

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका महाराष्ट्रातील अनेक भागांना बसला आहे.दरड कोसळून आणि नद्यांना पूर येऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.त्यासाठी कोकणातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना ठाण्यातून राष्ट्रवादी पक्षाकडून मोठ्या प्रमाणत जीवनाश्यक वस्तूची मदत म्हणून ४ ते ५ ट्रक भरून नुकसानग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आली आहे.
यामध्ये मॅगी,बिस्किट,मेणबत्त्या,माचिस, ब्लॅंकेट, पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. नुकसानग्रस्त भागातील लोकांना त्यांच्या जागी मदत मिळेल आणि येत्या चार दिवसांमध्ये संपूर्ण नुकसानग्रस्त भागापर्यंत हे मदत पोहोचवली जाईल असे यावेळी गृहनिर्माण मंत्री म्हणाले.