Sat. Oct 1st, 2022

राष्ट्रवादीने सहनशीलतेचा तरी पुरस्कार द्यायला हवा – उदयनराजे भोसले

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. राज्यात सुरू असलेल्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू असून साताऱ्यात दाखल झाला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवेंद्रराजे, उदयनराजे, चंद्रकांत पाटील उपस्तथित होते. राजकारणातील 15 वर्ष राष्ट्रवादीत वाया गेल्याची खंत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. तसेच EVM घोटाळा नसून लोकं कामं करणाऱ्यांना मतदान करत असल्यामुळे भाजपाचे निवडून येत असल्याचेही स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले उदयनराजे भोसले ?

शनिवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला.

खासदारकीचा राजीनामा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोपवल्यानंतर भाजपात प्रवेश केला.

मी नरेंद्र पाटलांच्या मिशांना घाबरत असल्याचे उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

काम घेऊन जायचो तेव्हा निराशा व्हायची त्यामुळे राष्ट्रवादीने सहनशीलतेचा तरी पुरस्कार द्यायला हवा होता.

राष्ट्रवादीत असताना आमची फाईल थेट कचऱ्यात जायची.

विकासाच्या कामासाठी राष्ट्रवादीशी भांडावं लागायचं.

राजीनामा देऊन आलो म्हणून समर्थकांना आनंद झाला.

कोणत्याही चौकशीला घाबरुन भाजपात प्रवेश केला नाही.

आधीचं सरकार कामं मार्गी लावायचं नाही.

माझा बॅंड दुसरा कोणीच वाजवू शकत नाही, माझा बॅंड मीच वाजवतो.

आताचं सरकार ही कामं मार्गी लावणारी लोकं आहेत.

हे सरकार सर्वांगिण विकास करत आहे.

हजारो कोटींची कामं मुख्यमंत्र्यांनी केली

सबसीडीसाठी फॅक्टरी काढल्या जातात आहे.

साताऱ्यात आयटी पार्क करायला हव्या असेही म्हटलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.