Fri. Dec 3rd, 2021

NCP ची सत्ता असलेली ‘ही’ एकमेव महापालिकाही आता हातातून निसटणार!

नवी मुंबई महापालिकेतील सत्तांतराच चित्र आज स्पष्ट होणार आहे. आज नवी मुंबई महापालिकेवर फडकणार भाजपचा झेंडा फडकेल. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेव सत्ता असलेली महापालिका हातून निसटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे 55 नगरसेवक आज पक्षातून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करणार आहेत.

9 तारखेला 55 नगरसेवकांचा गट गणेश नाईकांसोबत भाजपात प्रवेश करेल.

सोलापुरातही राष्ट्रवादीची गळती सुरूच

सोलापुरातदेखील राष्ट्रवादीची गळती सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून 20 व्या वर्षी सोलापुर जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा व गेल्या दोन वर्षापासून महिला अध्यक्ष म्हणून काम पाहत असलेल्या बार्शीच्या मंदाताई काळे यांनी आज राष्ट्रवादी पक्षाला रामराम केलाय. त्यांनी प्रदेश अध्यक्षाकडे आपला राजीनामा पाठवल्याचं सांगितलं आहे.

आज तरी त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसला, तरी जिल्ह्यातील सर्व महिलांशी कार्यकर्त्यांशी बोलून आणि जिल्ह्यातील इतर नेत्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *