Wed. Oct 5th, 2022

राष्ट्रवादीचं गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन

काय ते सिलेंडर, काय ती महागाई, काय ते भाजप सरकार सगळं एकदम नॉट ओके, अशा घोषणा देत पुण्यात आज राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले यावेळी सिलेंडरला हार घालून घरगुती गॅस सिलेंडरच्या ज्या किमती वाढल्या आहेत त्याच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या महिलांनी आंदोलन केले. इंधन दरवाढ तसेच घरगुती तेल वाढ त्यातच आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत देखील वाढ होत आहे’

त्याच्यामुळे सामान्य जनतेचे बजेट कोलमोडले आहे आणि अशावेळी या सर्वाला जबाबदार केंद्र सरकार आहे. असे म्हणत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी काय ते महागाई काय ते गॅस सिलेंडर काय ते भाजप सरकार ऑल नॉट ओके असे म्हणत घोषणा देत पुण्यात आंदोलन केले आहे. तर दुसरकीकडे राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकरण्यात आले आहे, आंदोलना दरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. नाशिक मध्ये डोक्यावर लाकडं आणि हातात गौऱ्या घेऊन महिलांनी आंदोनल केले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले आहे.

Pune | पुण्यात राष्ट्रवादीचं गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन | Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.