नागपुरात राष्ट्रवादीचं महागाईविरोधात आंदोलन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्या राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. तर दुसरीकडे राज्यात महागाईमुळे नागरिकांच्या खिशाला जास्तीची कात्री लागत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरात राष्ट्रवादी काँग्रेसने महागाईच्या विरोधात भोंगा आंदोलन केले आहे. नागपूरमधील शंकर नगर चौकातील पेट्रोल पंपाबाहेर राष्ट्रवादीने भोंगा आंदोलन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात महागाईच्या विरोधात भोंगा आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात शंकर नगर चौकातील पेट्रोल पंपाबाहेर भोंगा आंदोलन केले. भोंग्यावरून राज्यात धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचं चित्र आहे. मात्र, याच भोंग्यावरून महागाईचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहचावा, या हेतूने हे आंदोलन करण्यात आले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.