Wed. May 22nd, 2019

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी

370Shares

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून आज पुन्हा दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत पाच उमेदवारांची नावं जाहीर केली असून पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे उमेदावारीत नाव जाहीर केले नव्हते. मात्र राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दुसऱ्या यादीत कोण आहेत ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज दुसरी यादी जाहीर केली आहे.

या यादीत पार्थ पवार यांचे नाव असून त्यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

पहिल्या यादीत सस्पेन्स ठेवण्यात आलेल्या जागांची उमेदवारीही जाहीर केली आहे.

बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे.

नाशिकमधून समीर भूजबळ यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच शिरूरमधून डॉ अमोल कोल्हे तर दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *