Tue. Sep 28th, 2021

स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी मराठमोळ्या नीला विखे पाटील!

स्वीडन या देशाच्या पंतप्रधान  कार्यालयात  सल्लागार म्हणून भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयात अर्थ विभागाची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती नीला विखे पाटील कार्यभार सांभाळणार आहेत.

सध्या स्वीडनच्या पंतप्रधानपदाचा कारभार पाहणारे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी- ग्रीन पार्टी या पक्षांचे आघाडीचे नेते स्टीफन लोफवन यांच्यासोबत नीला काम करणार आहेत. नीला या अर्थ विभागात अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घरबांधणी या संदर्भात काम करणार आहेत. स्विडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोमच्या महापालिकेवरही त्या निवडून गेल्या आहेत.

कोण आहेत नीला विखे पाटील ?

  • नीला विखे पाटील या शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत.
  • माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत.
  • महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत.
  • नीला स्वीडनमधील ग्रीन पार्टीच्या सक्रिय सदस्य आहेत.
  • स्टॉकहोम विभागाच्या निवडणूक समितीमध्येही त्या सदस्य आहेत.
  • आधीच्या सरकारच्या कारकिर्दीतही नीला विखे पाटील या पंतप्रधान कार्यालयाच्या राजकीय सल्लागार म्हणून काम केलं आहे.
  • नीला विखे पाटील यांनी गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि विधिसंदर्भातील शिक्षण घेतलं आहे.
  • माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातून एमबीए केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *