Thu. May 6th, 2021

लॉकडाऊनमध्ये नेहा कक्कर करते रोहनप्रीतसोबत धमाल

काही दिवसांपूर्वी नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांनी लग्नाची बातमी देऊन चाहत्याना एक सरप्राईज दिलं होते. नेहा अनेकदा रोहनप्रीतसोबत तिचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा नेहाने फोटो शेअर करत लिहिलं ‘लॉकडाऊन टाईम, हंसते हंसते कट जाये रस्ते, जिंदगी युही चलती रहे! लव यू पार्टनर’ असं सुंदर कॅप्शनही दिलं आहे.नेहा लॉकडाऊनमध्ये काय करतेय हे अनेकांनी जाणून घेण्याची इच्छा असते. त्यामुळे नेहा अनेकदा तिच्या घरचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत असते.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगमध्ये खूपच छान केमेस्ट्री बघायला मिळते. त्यामुळे अनेक वेळा रोहनप्रीत सुद्धा नेहाचे आणि त्याचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. नेहा कक्करने 2006 मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ मध्ये भाग घेतला होता. त्यात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तसेच नेहा कक्कर आज ‘इंडियन आयडॉल’ मध्ये परीक्षक म्हणून काम करते. नेहाने आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर खूप कमी वयात खूप मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. नेहा कक्करने आपली बहीण सोनू कक्करकडून गाण्याची प्रेरणा घेतली आहे. यांचा भाऊ टोनी कक्कर हा सुद्धा एक उत्तम गायक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *