माझ्या नवऱ्याची मी तिसरी बायको, अभिनेत्री नेहा पेंडसेचा खुलासा

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे नुकतीच लग्नबंधनात अडकली . शार्दूल सिंग असं तिच्या पतीचं नाव शार्दूल असून तो उद्येगपती आहे. यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
लग्नानंतर एका मुलाखतीत बोलताना नेहा पेंडसेनं आपल्या नवऱ्याबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे तिच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.
तिचा नवरा शार्दूल याचा हा तिसरा विवाह आहे.
याआधी शार्दूलचे 2 वेळा विवाह झाले आहेत.
त्याला 2 सुंदर मुलीही आहेत, असं नेहा म्हणाली.
शार्दूला भेटण्याआधी आपणही 2-3 वेळा रिलेशनशिपमध्ये होतो, मात्र ही रिलेशन्स जास्त काळ टिकू शकली नाहीत.
नेहाने तिच्या लग्नात गुलाबी कलरची नऊवारी साडी नेसली होती.त्यात ती खुप सुंदर दिसतं होती.
लग्नात नेहाने घेतलेला उखाणा ही चांगलाच व्हायतल होत आहे.
चांदीच्या ताटात फणसाचे गरे,
शार्दूलरावआहेत बरे..
पण वागतील तेव्हा खरे
असा उखाणा नेहाने लग्नात घेतला. तिच्या उखाण्याचा हा व्हिडिओ अभिनेता अभिजीत खांडकेकरने Instagram वरून शेअर केला.