Thu. Jun 20th, 2019

काकूचा शरीरसंबंधांना नकार, पुतण्याने केलं गळा चिरून ठार!

0Shares

आपल्या काकूवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या पुतण्याने तिच्याकडून नकार मिळाल्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे ही भीषण घटना घडली आहे. काकू शरीरसंबंधांना नकार देत असल्याने पुतण्याने तिचा गळाच चिरून हत्या केली.

काय घडलंय नेमकं?

हमीरपूर येथील एका गावात बबलू खान आणि त्याची 29 वर्षीय पत्नी शबनम राहत होते.

त्यांचा झाडू तयार करण्याचा व्यवसाय होता.

या व्यवसायात बबलूचा पुतण्या निसार हा देखील छोटीमोठी मदत करत असे.

निसारचं आपली काकू शबनम हिच्यावर वाईट नजर होती.

तो अनेकदा काकूकडे शरीरसुखाची मागणीही करत होता.

मात्र काकू त्याला झिडकारत होती.

या गोष्टीचा निसारच्या मनात खूप राग होता.

5 मे रोजी सकाळच्या सुमारास शबनमचा पती बबलू कामासाठी बाहेर गेला होता.

यावेळी एकटेपणाचा फायदा घेत निसार याने पुन्हा शबनम काकूकडे शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती मागणी करायला सुरूवात केली.

शबनमने पुन्हा त्याला नकार दिला.

त्यामुळे संतापलेल्या निसारने सुऱ्याने आपल्या काकूचा गळा चिरून तिची हत्या केली.

शबनमच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारी राहणारे लोक घरी आले.

तेव्हा शबनमचा रक्तबंबाळ देह त्यांना दिसला. तसंच निसार हातात रक्त लागलेला सुरा घेऊन धावतानाही त्यांनी पाहिलं.

या प्रकरणाची त्यांनी ताबडतोब पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी ताबडतोब निसारचा शोध सुरू केला. निसार एका शेतात लपल्याचं आढळून आल्यावर त्याला तिथून पोलिसांनी ताब्यात घेतलं.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: