Mon. Jul 22nd, 2019

पार्थच्या पहिल्या भाषणाची खिल्ली; त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे – नितेश राणे

102Shares

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसेच सर्व राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी सज्ज झाली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. पार्थ पवार यांनी पहिल्यांदा भाषण केलं. मात्र सोशल मीडियावर नेटीझन्स त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवत आहेत. याबाबतीत नितेश राणे यांनी ट्विट करत त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे असे नेटीझन्सना म्हटलं आहे.

नितेश राणेचं ट्विट काय ?

पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी दिल्यानंतर पार्थ यांनी पहिल्यांदा भाषण केले.

या भाषणाची सोशल मीडियावर नेटीझन्स खिल्ली उडवत आहेत.

यावर नितेश राणे यांनी ट्विट करत त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे असं म्हटलं आहे.

पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाची खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.

पहिले भाषण आणि लोकांची प्रचंड गर्दी, त्यासाठी धाडस लागते!लंबे रेस का घोडा है … याद रखना! असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

त्यांच्या अशा ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

तसेच निलेश राणेंना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

102Shares

Leave a Reply

%d bloggers like this: