Sun. Oct 17th, 2021

अभिनेता अक्षय कुमारच्या जाहीरातीत शिवरायांचा अपमान ?

खिलाडी अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने केलेल्या एका डिटर्जंट पावडरच्या जाहीरातीमुळे तो वादात सापडला आहे. त्याने केलेल्या जाहीरातीत मावळे दाखवले गेले आहेत.

त्यामुळे हा शिवरायांचा अपमान केला आहे, अक्षय कुमारने माफी मागावी, अशी मागणी आता सोशल मीडियावरुन केली जात आहे.

या जाहिरातीवरुन अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करत ट्विट केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी या जाहिरातीचा निषेध केला आहे.

नक्की प्रकरण काय ?

डिटर्जंट पावडरच्या जाहीरातीत अक्षय कुमार आणि त्याचे सोबती लढाईवरुन परतात.

लढाईवरुन परतल्याने मावळ्यांचे कपडे खराब झालेले यात दाखवले गेले आहे.

या कपड्यांवरुन महाराणी भाष्य करतात. मळलेले कपडे स्वत: मावळे डिटर्जंट पावडरने धुवतात, असे या जाहीरातीत दाखवले आहे.

जाहीरातीत अक्षय कुमार म्हणतो की, ‘महाराजांचे मावळे शत्रूंची आणि कपड्यांचीही धुलाई कशी करायची हे जाणते, पार्टी पण होणार आणि धुलाई होणार.’

त्यानंतर जाहीरातीतल सहकारी मावळे आपले कपडे धुवताना दाखवले आहेत.

त्यामुळे या आक्षेपार्ह मुद्द्यावरुन अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

आपण नेहमीच सामाजिक कार्य करता.

तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. असे ट्विट अक्षय कुमारला उद्देशून एकाने ट्विट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *