‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकावरुन सोशल मीडियावर संताप

दिल्लीतील भाजप कार्यालयात आज रविवारी ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि अन्य नेत्यांची उपस्थिती होती.
हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
या पुस्तकावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी देखील केली जात आहे.
शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केली आहे. शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही.
त्यामुळे हे चुकीचं असल्याचं नेटकऱ्यांच म्हणनं आहे. अनेकांनी या पुस्तका विरोधात सोशल मीडियावरुन तीव्र शब्दांमध्ये रोष व्यक्त केला आहे.
काँग्रेस प्रवक्ता संजय सावंत, शिवसेना खासदार संजय राऊत, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी पुस्तकाबाबतीत ट्विट केलं आहे.
या ट्विटद्वारे या मंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांची तुलना शिवाजी महाराजांशी करत पुस्तक काढण्याचा प्रकार यावरुन भाजपच्या विकृत मानसिकतेचे दर्शन होते.
काज्यव्याची तुलना सूर्याशी होऊ शकत नाही. महाराजांची उंची कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. शिवरायांचा हा अवमान आहे, या शब्दात सचिन सावंत यांनी निषेध नोंदवला आहे.
शिवाजी महाराजांचा एकेरीत ऊल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली.
हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? असा सवाल संजय राऊतांनी छत्रपती उद्यन राजे भोसले, शिवेंद्रराजे आणि छत्रपती संभाजीराजेंना केला आहे.
पुस्तक प्रकाशनाचा फोटो ट्विट करत, यांचं डोकं फिरलंय, या शब्दात जितेंद्र आव्हाडांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे.
भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही.
हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, या शब्दात मंत्री धनंजय मुंडेंनी म्हंटलं आहे.