Tue. May 18th, 2021

सावधान! कोरोना पुन्हा नव्याने येतोय

‘कोरोना’ संपूर्ण जगाला हादरवून सोडलेल्या या रोगाने आता विकसित रुप धारण केल्यानं संपूर्ण जगाची डोकेदुखी आणखीच वाढली

शशांक पाटील, मुंबई -: ‘कोरोना’ संपूर्ण जगाला हादरवून सोडलेल्या या रोगाने आता विकसित रुप धारण केल्यानं संपूर्ण जगाची डोकेदुखी आणखीच वाढली आहे. ब्रिटनमध्ये विकसित झालेला हा कोरोना आता भारतात पोहचल्याने सर्वांनाच सावधान होण्याची वेळ आलेली आहे.
मागील वर्षी नोव्हेंबरच्या सुमारास चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोनाने २०२० या वर्षभरात संपूर्ण जगात थैमान घातल. दरम्यान या संकटातून जग कसेबसे सावरत असतानाच पुन्हा एकदा सर्वांना धडकी भरवण्यासाठी कोरोना नव्या रुपात आलायं. तर हा कोरोनाचा नवा स्ट्रेन सर्वांत आधी सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये आढळला त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये आढळणाऱ्या एक तृतीयांश कोरोना रुग्णांमध्ये हा नवा कोरोना आढळू लागला. आधीच्या कोरोनापेक्षा अधिक जलदगतीने पसरणारा हा कोरोना पूर्वीच्या कोरोनाचे विकसित रुप असल्याचे ब्रिटनक़डून नुकतंच जाहिर करण्यात आलं. यासंबधी माहिती मिळताच जगभरातील बहुंताश भागात ब्रिटनहून होणारी विमानसेवा स्थगित करण्यात आली. भारताने देखील त्वरीत निर्णय घेत २२ डिसेंबर रात्रीपासून ब्रिटनची विमानसेवा स्थगित केली. मात्र या आधीच उड्डणासाठी तयार झालेल्या विमानांना येणं अनिवार्य असल्यानं काही विमानं ब्रिटनमधून भारतात परतू लागली. दरम्यान सोमवारी रात्री दिल्लीत ब्रिटनमधून आलेल्या विमानातील पाच प्रवासी, तर रविवारी कोलकाता विमानतळावरही दोन ब्रिटनमधून आलेले प्रवासी कोरोनाबाधित आढळले. कोरोनाच्या नव्या रुपातील शत्रूसोबत लढण्यासाठी भारतीय सज्ज होत असतानाच शत्रू भारतात शिरल्याचं समोर आल्यानं प्रशासनासह नागरिकांचे धाबे दणाणलेत. मात्र या सर्वांत न घाबरता सावधानता बाळगण जास्त महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनसोबत लढण्य़ासाठी प्रशासनासह नागरिकांनी सावधान होऊन काळजी घेण्यास सुरुवात करन हे या लढाईतील पहिलं पाऊल आहे.

नक्की कसा आहे कोरोनाचा नवा स्ट्रेन ?

  • कोरोनाचा हा नवा स्ट्रेन म्हणजे कोरोनाचं विकसित रुप असंच म्हणता येईल. आधीच्या विषाणूपेक्षा अधिक जलदगतीनं पसरणारा हा कोरोना आपले म्यूटेशन देखील अधिक वेगात आणि शक्तिशालीपणे करत आहे. म्यूटेशन म्हणजे कोरोनाचा विषाणू आपली अंतर्गत रचना बदलतो ज्यामुळे त्याचे गुणधर्म बदलून घातकता वाढते.

कसा जन्मला हा नवा स्ट्रेन ?

  • ब्रिटनमध्ये उदयास आलेला हा नवा स्ट्रेन प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या काही व्यक्तींच्या शरीरातून जन्माला आला आहे. संबधित व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या असताना त्यांना कोरोनावर मात मिळवणं शक्य़ न झाल्यानं त्यांच्या शरीरातील विषाणू आणखी शक्तीशाली होऊन हा स्ट्रेन जन्माला आला.

सर्वांत आधी या नव्या स्ट्रेनमुळे घाबरुन न जाता काळजी घेणे गरजेचे आहे. याआधी कोरोनाशी लढण्यासाठी वापरत असलेली त्रिसुत्री मास्क, सामाजिक अंतर, हात धुवा हीच अवलंबना महत्त्वाचं आहे. फक्त याआधी घेत असलेली काळजी अधिक सतर्कतेने घेणे आता अनिवार्य झाले आहे. – अविनाश भोंडवे, आरोग्यतज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *