Wed. Aug 21st, 2019

फेक फोटोंची आता तुम्हीच करा पोलखोल!

0Shares

फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर्स प्रसिद्ध झाल्यापासून अनेक फोटोंना एडिट करून करून खोट्या रूपात प्रसिद्ध करण्याचं प्रमाण वाढलंय. फोटोशॉप वापरून अनेक फेक फोटोज तयार केले जातात आणि ते व्हायरल होतात. मात्र आता फेक फोटोंची पोलखोल होणार आहे. कारण फोटोशॉप सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या अॅडोब कंपनीने एक विशेष टूल तयार केलं आहे. या टूलमुळे फोटोशॉप केलेला फोटो ओळखणं शक्य होणार आहे.

फोटोशॉप केलेले फोटो आता ओळखता येणार!

बऱ्याचदा एखाद्या फोटोची छेडछाड करून फेक फोटो तयार केला जातो.

मॉर्फिंग करून एका व्यक्तीच्या शरीरावर दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा लावला जातो.

यांसारख्या खोट्या फोटोंचा एवढा सुळसुळाट झाला आहे, की त्यामुळे खरं काय आणि खोटं काय याबाबत सोशल मीडियावर संभ्रम निर्माण होतो.

यावरच आता अॅडोबने उत्तर शोधून काढलंय.

अॅडोबच्या नव्या टूलमुळे एडिट केलेला किंवा फोटोशॉप केलेला फोटो ओळखता येणार आहे.

या टूलचं नाव Artificial Intelligence (AI) असं आहे.

फोटोमधील चेहऱ्यात जर काही बदल केले गेले असतील, तर ते बदलदेखील ‘फेस अवे लिक्विफाय’ नावाच्या फिचरमुळे ओळखता येऊ शकेल.

चेहऱ्याचा आकार, नाक, कान डोळे, ओठ यांसारखे अवयव फोटोत सुंदर दिसावेत, यासाठी अनेकजण फोटोशॉपचा वापर करतात.

मात्र ‘Face away liquefy’ या फिचरमुळे हे बदल ओळखता येणं शक्य होणार आहेत.

या टूलमुळे फोटोमध्ये एडिट करून केलेले बदल ओळखता येणं शक्य आहे.

फोटो, व्हिडिओ, ऑडिओ यांमध्ये केलेलं एडिटिंगदेखील या नव्या टूलमुळे ओळखता येणार आहे.

हे टूल युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कलेतील संशोधकांच्या सहकार्याने तयार करण्यात आलं आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *