Tue. Oct 26th, 2021

मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या महाअधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण कऱण्यात आलं. शिवसेनेने आपल्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेशी सत्तेत येताना तडजोड केल्यामुळे मनसेने आता हिंदुत्वाची कास धरली आहे. यापूर्वी निळा, भगवा, हिरवा हे रंग असणारा झेंडा आता पूर्णपणे भगवा झाला आहे. या झेंड्यावर शिवमुद्रा आहे.

मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानात मनसेचं पहिलं महाअधिवेशन भरलं.

व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा असल्यामुळे त्यावरून चर्चेला उधाण आलं.

बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून राज ठाकरे यांनी अधिवेशनाला आरंभ केला.

या अधिवेशनाच्या सकाळच्या सत्रात नव्या झेंड्याचं अनावरण कऱण्यात आलं.

संध्याकाळी राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.

झेंड्यावर असलेल्या शिवमुद्रेवर यापूर्वी संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता. मात्र ध्वजावरील शिवमुद्रेला कोणी ही विरोध केला असला तरी हाच झेंडा असणार असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांचे म्हणणं आहे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *