Tue. Jul 14th, 2020

मांडवी आणि कोकणकन्येने रुपडे बदलले…

कोकण वासियांना आधार असलेल्या आणि कोकण रेल्वेची शान असलेली मांडवी आणि कोकणकन्या एक्सप्रेस आता कोकण वासियांना एका नव्या रूपात दिसणार आहे. या गाड्या लाल करड्या रंगात आणि नव्या सुविधांसह प्रवाशांच्या सेवेत हजर होणार झाली आहे. या गाड्या 10 जून ते 31 जून 2019 पर्यंत तात्पुरत्या धावणार आहेत. तर या गाड्या कायमस्वरूपी 1 सप्टेंबरपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहेत. या गाड्यांचे कोकण वासियांची स्वागत केले आहे.

नव्या रुपातील मांडवी आणि कोकणकन्या

कोकण रेल्वेची शान असलेली मांडवी व कोकणकन्या एक्सप्रेस आता कोकण वासियांना एका नव्या रूपात दिसणार आहे.

या गाड्या लाल करड्या रंगात आणि नव्या सुविधांसह प्रवाशांच्या सेवेत हजर होणार आहे.

या गाड्यांमधून प्रवाशांना आता सुखद, सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

या गाड्यांचे ICF कोच बदलून अधिक लांबीचे व अधिक प्रवासी क्षमता असलेले एलएचबी कोच जोडण्यात आले आहेत.

या गाड्यांची प्रवासी क्षमता वाढविताना बोगींची संख्या पूर्वीच्या 24 वरून आता 22  करण्यात आली आहे.

या LHB कोचमध्ये एलईडी दिवे, हायड्रॉलिक शॉक अ‍ॅबसॉर्बर्स, डिस्क बे्रक प्रणाली, उत्तम सस्पेंशन या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

या गाड्यांचे कोकण वासियांची स्वागत केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *