Thu. May 6th, 2021

काय आहेत टाळेबंदीचे नवीन नियम?

महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. बुधवारी राज्यातील निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले असून २२ एप्रिल म्हणजेच आज रात्री ८ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. तसेच १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात हे कडक निर्बंध राहणार आहे. या नियमावलीनुसार, मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल.

काय आहेत टाळेबंदीचे नवीन नियम ?

१. आज रात्री ८ वाजल्यापासून राज्यात कडक टाळेबंदी सुरू
२. १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक टाळेबंदी
३. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद
४. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद
५. राज्यात जिल्हाबंदी लागू
६. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद
७. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी
८. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी
९. सार्वजनिक वाहतूक ५०% क्षमतेनं चालणार
१०. एसटी बस वाहतूक ५०% क्षमतेनं सुरू राहणार
११. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा
१२. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास १० हजार रूपये दंड
१३. सरकारी कार्यालयांमध्ये १५% उपस्थिती
१४. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं १५% हजेरीनं चालणार
१५. लग्न समारंभासाठी २५ जणांना फक्त २ तासांसाठी परवानगी
१६. लग्नाचे नियम मोडल्यास ५० हजार रूपये दंड भरावा लागणार
१७. बाहेरून येणाऱ्यांना १४ दिवस गृह विलगीकरणात ठेवणार
१८. गृह विलगीकरणातील नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक
१९. कोरोना संक्रमित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार
२०. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार
२१. किराणा, भाजीची दुकानं सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरु राहणार

संपादन – सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *