Mon. Jan 24th, 2022

नवनिर्वाचित मंत्री आज पदभार स्वीकारणार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार करण्यात आला. यावेळी नव्या मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. हे सर्व नवे मंत्री आज आपला पदभार सांभाळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेत मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांनी बुधवारी शपथ घेतली. ज्योतिरादित्य शिंदे आणि नारायण राणे यांच्यासह आठ नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला दुसरा कार्यकाळ सुरु केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपरिषदेत फेरबदल आणि विस्तार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी – विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग
अमित शाह – सहकार मंत्रालय, गृह मंत्रालय
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्रालय
निर्मला सीतारामण – केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार
मनसुख मांडवीय – केंद्रीय आरोग्य मंत्री, रसायन आणि खते विभाग
नितीन गडकरी- रस्ते वाहतूक आणि महामार्ग
नरेंद्र सिंह तोमर – कृषी व शेतकरी कल्याण
स्मृती इराणी – महिला आणि बालविकास मंत्रिपद
धर्मेंद्र प्रधान -केंद्रीय शिक्षणमंत्री
पीयूष गोयल – केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रिपद
अश्विनी वैष्णव – केंद्रीय रेल्वेमंत्री
हरदीपसिंह पुरी – पेट्रोलियम मंत्रिपद
ज्योतिरादित्य शिंदे – नागरी उड्डाण मंत्रालय
नारायण राणे – मध्यम व लधु उद्योग मंत्रालय
भुपेंद्र यादव – केंद्रीय कामगार मंत्रालय
पुरुषोत्तम रुपाला – दुग्धविकास, मत्स्योत्पादन खातं
अनुराग ठाकूर – केंद्रीय क्रीडामंत्री
पशुपती पारस -अन्न प्रक्रिया मंत्रालय
किरण रिजिजू – केंद्रीय कायदेमंत्री
गिरीराज सिंह – केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय
आर के सिंह – केंद्रीय ऊर्जामंत्री

तसेच नवे केंद्रीय मंत्री १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नव्या केंद्रीय मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *