Thu. Mar 21st, 2019

छ. उदयनराजे आगामी निवडणूक ‘या’ पक्षातर्फे लढणार?

0Shares

मराठा क्रांती मोर्चाचा आणि मराठा संघटनांचा विरोध डावलून मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रांती सेना असं या पक्षाचं नाव आहे. यावेळी सुरेश पाटील यांनी पाडव्याच्या मुहुर्तावर रायरेश्वर येथे शपथ घेतली. आजपासून पक्षाच्या बांधणीला सुरवात करण्यात आली आहे. या पक्षस्थापनेच्या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेष म्हणजे खा. छत्रपती. उदयनराजेंचे फोटो असलेले बॅनर्स या ठिकाणी पहायला मिळत होते. या संदर्भात विचारलं असता उदयनराजे भोसले यांनी संपूर्ण पाठिंबा दिला असून लोकसभेच्या निवडणुकीसाठी उदयनराजे हे आमचे पुढचे उमेदवार असतील, असं वक्तव्य पक्ष संस्थापक सुरेश पाटील यांनी केलं. उदयनराजे यांनी आमच्या पक्षातून निवडणूक लढवावी, अशी विनंती आपण उदयनराजेंना करणार असल्याचंही सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे. आता सुरेश पाटील यांच्या विनंतीला उदयनराजे मान देणार का, हे लवकरच कळेल.

मात्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या या पक्षामुळे संभाजी ब्रिगेडचा मतदार विभागला जाण्याची शक्यता आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मतदारही ‘महाराष्ट्र क्रांती सेने’कडे वळणार का, असा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *