औरंगाबादमध्ये नवे निर्बंध लागू

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. औरंगाबादमध्ये हुरडा पार्टी, रिसॉर्ट, फार्महाऊसवर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. तर सरकारी, निम-सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याचा निर्णय औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. तसेच लग्ना समारंभासाठी ५० पेक्षा अधिक नागरिक येणार नाही याचे हमीपत्र बंधनकारक असणार आहे.
औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीत औरंगाबादमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यात नागरिकांना लसीकरण आणि मास्कशिवाय पेट्रोल नाही, असा निर्णय लागू करण्यात आला आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांचा परवाना आरटीओ रद्द करणार असल्याची कारवाई सुरूच राहणार आहे. नागरिकांनी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि जर कोणत्याही कोरोना रुग्णाला घरीच आयसोलेशन केले असेल तर घरातील सर्व सदस्यांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे बंधनकारक आहे.