Fri. Jun 21st, 2019

कोल्हापुरात क्रीडेला अंधश्रद्धेची कीड, मैदानात फूटबॉल, मोज्यामध्ये लिंबू!

126Shares

अनेक खेळाडू एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवून असतात. ती गोष्ट आपल्यापाशी असल्यास आपण खेळात जिंकतो असा त्यांचा विश्वास असतो. मात्र राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरात मात्र भलतीच अंधश्रद्धा बोकाळल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे कोल्हापुरातल्या प्रसिद्ध फुटबॉल सामन्यांदरम्यान हा अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आलाय. लिंबू घेऊन मैदानात उतरणारा संघ विजयी होतो, अशी अंधश्रद्धा कोल्हापुरात रूढ झालीय.

मैदानात रंगेहाथ सापडलेल्या खेळाडूमुळे यावर शिक्कामोर्तब झालंय. एका आमदाराच्या नावाने सुरू असलेल्या चषकामध्ये स्थानिक संघाच्या परदेशी खेळाडूकडून हा प्रकार घडलाय.

फुटबॉलला अंधश्रद्धेचा विळखा!

शाहू स्टेडियमवर फुटबॉलचा सामना सुरू होता.

यामध्ये सॅनो पॅटस हा परदेशी खेळाडू सॉक्समध्ये लिंबू घालून खेळत होता.

मैदानावरील प्रेक्षकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी मैदानावरून ‘लिंबू-लिंबू’ म्हणत याकडे पंचांचे लक्ष वेधलं.

त्यानंतर या खेळाडूला पंच सुनील पवार यांनी पिवळं कार्ड दाखवून बाहेर काढलं.

कोल्हापूरच्या फुटबॉलला मोठी परंपरा असून स्थानिक सामनेसुद्धा इथे चुरशीने आणि 2 हजारांहून जास्त प्रेक्षकांच्या उपस्थितीत होतात.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून मैदानावर लिंबू घेऊन आलेला संघ जिंकत असल्याची अंधश्रद्धा इथे रूढ झाली आहे.

खेळाडूंच्या या कृत्याबद्दल इतर संघांच्या प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

126Shares

Leave a Reply

%d bloggers like this: