Wed. May 19th, 2021

TikTok च्या अभूतपूर्व यशानंतर आता थेट TikTok स्मार्टफोन!

Tik Tok या app ने तरुणांना वेड लावलंय. आता तर Tik Tok वर लोकप्रिय होण्यासाठी काय करावं, याचं प्रशिक्षण देणारे कोचिंग क्लासेसही सुरू झाले आहेत. आता त्याच्याच पुढे पाऊल टाकत Tik Tok आता स्मार्टफोन लाँच करणार आहे.

Tik Tok हे app ज्या कंपनीने तयार केलंय त्या ByteDance या कंपनीने आता स्मार्टफोन क्षेत्रातच उतरण्याचा निर्णय घेतलाय.

ByteDance ने Smartphone साठी ‘स्मार्टिसन’ या चायनिज कंपनीशीच पार्टनरशिप केली आहे.

स्मार्टिसनकडून पेटंट आणि कारागिर ByteDance ला मिळणार आहेत.

Apple प्रमाणेच ByteDance च्या स्मार्टफोनमध्ये त्यांचे काही स्वतःचे Apps असतील.

Tik Tok प्रमाणे Music, Streaming, News यांसाठी विशेष apps या smartphone मध्ये असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *