Fri. May 29th, 2020

महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी व्याख्यानाच्या विरोधाला नवा ट्विस्ट

अमोल धर्माधिकारी, पुणे

महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानात तुषार गांधी यांना मज्जाव केल्यावरुन नवा ट्विस्ट समोर आलाय.

मुळात काल तुषार गांधी यांनी ट्विट करुन ‘पतित पावन संघटनेनी मला येण्यास बंदी केली. त्यामुळे सदरच्या कार्यक्रमात न येण्याचं आवाहन आयोजक गजानन एकबोटे यांनी केलं होतं.

पतित पावनच्या विद्यार्थी संघटनेनी भेटून तुषार गांधी यांना व्याख्यानाला बोलावू नका, महाविद्यालयातील वातावरण दूषित व्हायला नको अशी अपेक्षा त्यांनी केली होती, त्यामुळे गजाजन एकबोटे यांनी कार्यक्रमात तुषार गांधी आणि अन्वर राजन यांना येण्यास बंदी केली, असं सांगण्यात येत होतं.

मात्र असा कुठलाच विरोध पतित पावन संघटनेकडून करण्यात आला नसून गजाजन एकबोटे यांनी आमची बदनामी केली आहे.

त्यामुळे संघटनेकडून गजानन एकबोटे यांचा निषेध केला.

मात्र तुषार गांधीना केलेल्या विरोधामुळे राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले.

त्यामुळे मॉडर्न महाविद्यालयात होणारा कार्यक्रम कुणाच्या सागण्यावरून रद्द असा प्रश्न उपस्थित झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *