Wed. Oct 5th, 2022

चीनमध्ये नव्या विषाणूचा उद्रेक

चीनमध्ये नऊ लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुनच्या ईशान्येकडील औद्योगिक केंद्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनानंतर आता नव्या विषाणूच्या प्रसारामुळे चीनच्या चांगचुंग शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये आढळला होता. चीननंतर हा कोरोना संपूर्ण जगभर पसरला. कोरोनामुळे मोठ्या संख्येने नागरिक मरण पावले आहेत. कोरोना परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आली नसताना आता चीनमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूमुळे जगभरात दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले  आहे.

चीनमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूचे एकूण ३९७ रुग्ण नोंदावली असून त्यापैकी ९८ रुग्ण चांगचुनच्या आसपास असलेल्या भागात सापडली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.