Tue. Jun 15th, 2021

नववर्षाची भेट..!परळ टर्मिनसचे रविवारी होणार लोकार्पण 

OLYMPUS DIGITAL CAMERA

उद्या पासून परळ टर्मिनस सुरु होणार आहे. दादर स्टेशनवरील गर्दीचे विभाजन करण्यासाठी परळ स्थानकाचे रूपांतर ‘टर्मिनस’मध्ये करण्यात येत आहे.

रविवारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते स्थानकाचे लोकार्पण होणार आहेत.

दादर स्टेशनवरून कल्याणकडे सुटणाऱ्या 16 लोकल ट्रेन सोमवारी परळ टर्मिनस वरुन सुटणार आहेत.

गर्दीचे विभाजन

दादर स्टेशनवरील गर्दीचे विभाजन करण्यासाठी परळ स्थानकाचे रूपांतर ‘टर्मिनस’मध्ये करण्यात येत आहे.

परळ स्थानकावर तीन ठिकाणी स्वतंत्र रॅम्प, सरकता जिना, तसेच लिफ्ट आणि तीन प्लॅटफॉर्म तर लष्काराकडून पादचारी पूल बनविण्यात आला आहे.

गर्दीमुळे लोकलवर पडणारा ताण आणि चेंगराचेंगरीच्या घटना यामुळे रेल्वे प्रशासनाने परळ टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला.

परळमधून कल्याण, कसारा, कर्जत या दिशेने लोकल रवाना होणार आहेत.

त्यामुळे दादर स्थानकावरील गर्दीचा भार कमी होईल.

या टर्मिनससाठी अंदाजे ९० कोटी रुपये खर्च झाला असल्याची माहिती आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *