Fri. Jun 21st, 2019

#NZvInd: भारताचा अवघ्या 4 धावांनी पराभव, न्यूझीलंडची 2-1 ने बाजी

41Shares

न्यूझीलंडनं 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताला 4 धावांनी पराभूत केले आहे.

यासोबत भारताला 2-1 च्या फरकाने मालिका सुद्धा किवींनी आपल्या नावे केली आहे.

हा सामना भारताने जिंकल्यास न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली असती. परंतु अवघ्या काही धावांनी भारताने स्वप्न अपूर्णच राहिले आहे.

एवढेच नव्हे तर भारताचा गेल्या 10 टी-20 मालिकांमध्ये अजेय राहण्याचा विक्रम सुद्धा मोडीत काढला आहे.

मॅचच्या सुरुवातीला रोहित शर्माने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडने तूफान फलंदाजीसह पूर्ण 20 ओव्हर खेळले तसेच भारतासमोर विजयासाठी 212 धावांचे आव्हान दिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना गडी गमवून फक्त 208 धावा पूर्ण केल्या.

टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडने तूफान फलंदाजी केली.

41Shares

Leave a Reply

%d bloggers like this: