Thu. Sep 23rd, 2021

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडची बाजी

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात अखेर न्यूझीलंडने बाजी मारली. न्यूझीलंडने ८ विकेट्सने भारताचा पराभव केला. अंतिम सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली.

भारताचे सर्व फलंदाज काही धावांच्या अंतरावर बाद झाले. भारताचा दुसरा डाव अवघ्या १७० धावांवर आटोपला, तर दुसऱ्या डावात भारताकडून फक्त ऋषभ पंतने सर्वाधिक ४१ धावा केल्या. तसेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने ८९ चेंडूत ५२, तर रोस टेलर याने १०० चेंडूत ४७ धावा करत न्यूझीलंड संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली.

न्यूझीलंडचे टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी सावधपणे खेळण्यास सुरुवात केली. या दरम्यान लॅथम ९ धावा करुन बाद झाला. त्यानंतर डेव्हॉन कॉन्वे १९ धावांवर बाद झाला. मात्र, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी डाव सावरला. या दरम्यान, केन याने अर्धशतक झळकावलं. त्याने ८९ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. तर टेलरने १००चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *