NZvsIND,1st Test : न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा १० विकेटने दारुण पराभव

पहिल्या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियावर १० विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह न्यूझीलंडने २ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.
विशेष म्हणजे यजमान किंवींचा १०० कसोटी विजय ठरला आहे.
टीम इंडियाने न्युझीलंडला दुसऱ्या डावात विजयासाठी अवघ्या ९ धावांचे आव्हान दिले होते. हे माफक आव्हान न्यूझीलंडने १० विकेटने पार केले.
टीम इंडियाने दुसऱ्या डावामध्ये १९१ धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला न्यूझीलंडला ९ धावांचे आव्हान दिलं होतं.
लॅथम आणि ब्लंडल या दोघांनी हे विजयी आव्हान पार केलं.
टीम इंडियाने पहिला कसोटी सामना गमावला आहे.
त्यामुळे आता टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दुसरी कसोटी जिंकणं आवश्यक असणार आहे.
स्कोअरकार्ड
न्यूझीलंड, दुसरा डाव – ९ धावा
टीम इंडिया, दुसरा डाव – १९१ ऑलआऊट
न्यूझीलंड, पहिला डाव – ३४८ सर्वबाद
टीम इंडिया, पहिला डाव – १६५ सर्वबाद