Sat. May 25th, 2019

न्यूझीलंडमधील हल्ल्याचा व्हिडिओ फेसबुकनं हटवला

15Shares

न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथील दोन मशिदींवर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने लाइव्ह केलेला व्हिडिओ फेसबुकने जगभरातील 15 लाख यूजर्सच्या प्रोफाइलवरून हटवला आहे.

त्यातील 12 लाखांहून अधिक यूजर्सच्या प्रोफाइलवरील व्हिडिओ ब्लॉक करण्यात आले आहेत.

फेसबुकने ट्विटच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे.

न्यूझीलंडमधील मशिदींवरील हल्ल्यातील बळींचा आकडा 50च्या वर पोहोचला आहे.

हल्लेखोराने या हल्ल्याचा फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओ केला होता. याबाबत पोलिसांनी माहिती दिल्यानंतर तात्काळ हा व्हिडिओ फेसबुकवरून हटवण्यात आला होता.

तसेच त्याचे अकाउंटही काढून टाकले होते. हल्ल्याचे लाइव्ह चित्रण एका कॅमेऱ्यातून करण्यात आले होते आणि तो कॅमेरा हल्लेखोराने शरीरावर लावला होता, असे प्रथमदर्शनी दिसत होते.

इमारतीत घुसून जे लोक दिसतील त्यांच्यावर बेधुंद गोळीबार करत असल्याचे त्या व्हिडिओत दिसत होते.

दरम्यान हल्ल्यानंतर सुरुवातीच्या 24 तासांत फेसबुकने 15 लाख यूजर्सच्या प्रोफाइलवरून हा व्हिडिओ हटवला आहे, अशी माहिती फेसबुकने ट्विटवरून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *