Tue. Sep 28th, 2021

न्यूझीलंडच्या खेळाडूंनी दाखवली खेळाडूवृत्ती

क्रिकेटला जेंटलमन गेम का म्हंटलं जातं याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी खेळाडू वृत्तीचं दर्शन करुन दिलं आहे.

दुखापतीमुळे चालायला त्रास होत असल्याने न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंनी वेस्टइंडिजच्या खेळाडूला आपल्या हातांवर बसवून बाऊंड्री लाईन पर्यंत नेलं. हा सर्व प्रकार पाहून वेस्टइंडिज आणि न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममधील खेळाडूंनी उभं राहून टाळ्या वाजवल्या.

नक्की काय झालं ?

सध्या दक्षिण आफ्रिकेत अंडर-१९ वर्ल्ड कप स्पर्धा खेळली जात आहे. २९ जानेवारीला न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात कॉटर फायनल मॅच खेळली गेली. ही मॅच न्यूझीलंडने २ विकेटने जिंकली.

मॅचसोबत न्यूझीलंडच्या खेळाडूंनी क्रिकेट चाहत्यांची मनं देखील जिंकली.

पहिली बॅटिंग करणाऱ्या टीम वेस्टइंडिजच्या किर्क मॅकेन्झीला 43 व्या ओव्हरमध्ये उजव्या पायाला क्रॅम्प आला. यामुळे किर्कच्या पायाला असह्य वेदना झाल्या. या वेदनांमुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर जावे लागले.

रिटारयर्ड हर्ट होऊन बाहेर गेलेला किर्क वेस्टइंडिजची ९ वी विकेट गेल्यानंतर पुन्हा मैदानात खेळायला उतरला. परंतु वेदना कायम होती. त्यामुळे जागचा हळता ही येत नव्हते. क्रिक हा क्रिस्तिन क्लार्कच्या बॉलिंगवर बोल्ड झाला. वेस्ट इंडिजचा डाव २३८ धावावंर गुंडाळला..

टीम ऑलआऊट झाल्यानं दोन्ही संघ ड्रेसिंग रुमच्या दिशेनं निघाले. परंतु ड्रेसिंग रुमच्या दिशेने जाताना क्रिकला संघर्ष करावा लागत होता.

हे पाहून न्यूझीलंडचा कॅप्टन ताशकोफ आणि फील्ड हे मदतीसाठी पुढे सरसावले. या दोघांनी क्रिकला उचलून बाऊंड्री लाईन पर्यंत नेले.

या सर्व प्रकाराचा व्हिडिओ क्रिकेट वर्ल्ड कप या अधिकृत ट्विटर खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *