Wed. May 22nd, 2019

न्यूझीलंडमध्ये एका मशिदीत गोळीबार; ४९ जणांचा मृत्यू

50Shares

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथे एका मशिदीत अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात ४९ जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी दिली आहे. मशिदीत संध्याकाळी प्रार्थना झाल्यानंतर गर्दी असताना गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

न्यूझीलंडच्या ख्राईस्टाचर्च येथील एका मशिदीत अंदाघुंद गोळीबार झाला.

या गोळीबारात ४० जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर झाल्याची माहिती न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी सांगितले.

तसेच न्यूझीलंडच्या पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

यामध्ये तीन पुरुष एक महिलेचा समावेश आहे.

त्याचबरोबर कारमध्ये अनेक स्फोटके सापडली असून स्फोटके निकामी करण्यात यश मिळाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तसेच त्या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.

ही दुर्घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी बांगलादेश क्रिकेट संघदेखील होता. मात्र तो संघ सुरक्षित असल्याचे समजते आहे.

या हल्ल्यातनंतर या परिसरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

तसेच लोकांना घराबाहेर जाण्यापासून बंदी घातली आहे.

हल्लेखोराने लष्कर जवानांसारखे कपडे घातले होते, अशी माहिती समोर आली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *