टीम इंडिया विरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात टेस्ट सीरिज खेळण्यात येणार आहे. कसोटी सीरिज २ सामन्यांची असणार आहे. या कसोटी मालिकेसाठी टीम न्यूझीलंडची घोषणा करण्यात आली आहे.

न्यूझीलंड टीममध्ये वेगवान बॉलर काईल जेमिसनचा समावेश करण्यात आला आहे. जेमिसनने टीम इंडिया विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली होती.

याशिवाय ट्रेंट बोल्टचं ही संघात पुनरागमन झालं आहे. ट्रेटं बोल्टच्या कमबॅकमुळे न्यूझीलंडची बॉलिंग आणखी मजबूत झाली आहे.

टीम इंडिया गेल्या महिन्याभरापासून न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत किवींचा ५-० व्हॉइटवॉशने पराभव केला. तर वनडे सीरिजमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला जशास तसे उत्तर दिले.

किवींना वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाला व्हॉइटवॉश दिला. न्यूझीलंडने वनडे सीरिजमध्ये ३-० अशा एकतर्फी पराभव केला.

दरम्यान काही दिवसांआधी न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियामध्ये मुंबईकर पृथ्वी शॉ याचं कमबॅक झालं आहे.

तर रोहित शर्माला दुखापत असल्याने शुभमन गिल याला संधी देण्यात आली आहे.

न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज

पहिली टेस्ट , २१ – २५ फेब्रुवारी, वेलिंग्टन.

दुसरी टेस्ट , २९ फेब्रुवारी – ४ मार्च, खाइस्ट चर्च

टीम न्यूझीलंड : केन विल्यमसन (कॅप्टन ), टॉम लाथम, टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, हेनरी निकोलस, बीजे वॅटलिंग (विकेटकीपर), कॉलिन डी ग्रॅन्डोम्मे, टिम साउथी, नील वॅग्नर, ट्रेंट बाउल्ट, अजाज पटेल, काईल जेमीसन आणि डॅरेल मिशेल

टीम इंडिया : विराट कोहली (कॅप्टन), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि इशांत शर्मा

Exit mobile version