Mon. Jul 22nd, 2019

#WorldCup2019 न्यूझीलंडचा दणदणीत विजय; पुन्हा अव्वल स्थानी

0Shares

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकामध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचे 4 गडी राखून विजय मिळवला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाबाद 106 धावांची दमदार खेळी केली. विलियम्सनच्या धडाकेबाज खेळीमुळे न्यूझीलंडला विजय मिळवण्यात यश मिळाले. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 242 धावांचे आव्हान दिले. हा सामना जिंकल्यामुळे न्यूझीलंडने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठले आहे.

न्यूझीलंड पुन्हा अव्वल स्थानी –

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकामध्ये सामना एजबस्टन स्टेडियमवर रंगला.

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दक्षिण आफ्रिकाने  न्यूझीलंडसमोर 242 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड पराभवाच्या दिशेने जात असताना कर्णधार केन विलियम्सनने दमदार खेळी केली.

विलियम्सनने १३८ चेंडूत 106 धावा करत शतक पूर्ण केले.

नाबाद खेळी करत न्यूझीलंडच्या कर्णधाराने संघाला विजय मिळवून दिला.

ग्रँडहोमने 60 धावा करत माघारी परतला.

न्यूझीलंडकडून फर्ग्युसनने ३ बळी घेतले.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: