Fri. Dec 3rd, 2021

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू

रुग्णालयाच्या हलगर्जीपणा नवजात बालकाच्या जीवावर बेतला आहे. नुकत्याच या जगात आलेल्या बालकाला केवळ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जीवाला मुकावे लागले आहे.

कुठे घडली घटना ?

हा सर्व प्रकार भिवंडीत घडला आहे. भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात झाला आहे.

सकाळी 5 वाजून 20 मिनीटाला नवजात बालकाचा जन्म झाला. परंतु काही तासताच योग्य उपचार न मिळाल्याने नवजात शिशूचा मृत्यू झाला आहे.

आपल्या बालकाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी एकच गोंधळ घातला.  

कुटुंबियांच काय म्हणंन आहे ?

बाळाचा जन्मला तेव्हा चांगल्या स्थितीत होता. परंतु वेळेत उपचार  न मिळाल्याने शिशूचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

यासर्व प्रकरणामुळे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घातला.

दरम्यान या अगोदरही अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या रुग्णालयात उपचारासाठी पुरेश्या प्रमाणात कर्मचारी नाहीत.

यामुळे असे प्रकार घडत आहेत. तसेच रुग्णालयातील व्यवस्थापन ढिसाळ असल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *