Tue. Aug 9th, 2022

‘फडणवीस – शिंदे भेटीचे वृत्त खोटे’

एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे राज्यात वातावरण तापलेले आहे. शिंदेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती मिळते आहे. शुक्रवारी एकनाथ शिंदे हे अचानक रात्री प्रायव्हेट जेटने गुजरातला गेले होते. त्याच रात्री देवेंद्र फडणवीस मुंबई विमानतळावरुन बडोद्याला गेले होते. या बातमीमुळे शिंदे आणि फडणवीस यांची भेट झाली आहे अशा चर्चांना उधाण आले आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी यासंबंधी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, ‘ अशी कोणतीही भेट झालेली नाही, झाली असती तर देवेंद्रजींनी आम्हाला कळवले असते. त्यांनी असे वक्तव्य केल्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांची भेट झाली या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अशी भेट लपूनछपून घेण्याची काही गरज नाही. या केवळ अफवा आहेत, असे ते म्हणाले. ‘शिवसेनेमध्ये फूट पडली. त्याचे खापर भाजपवर फोडू नये’, असेही त्यांनी सांगितले. भाजपने काहीही सांगितल्यावर शिवसेनेचे आमदार फुटतात का ? असा सवाल सुधीर मुनगंटीवारांनी विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.