Jaimaharashtra news

Surgical Strike 2 वरून ‘या’ पाक अभिनेत्रीचा प्रियंका चोप्राला सवाल!

पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं ताबडतोब उत्तर देऊन Air Strike केलं. या हल्ल्यात भारतानं जैश-ए-मोहम्मदच्या 300 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केलं. बॉलिवूड सेलिब्रेटिंनीही याचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला. यात बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रानेही भारतीय वायूसेनेचं कौतुक करणारं ट्वीट केलं. मात्र तिच्या या ट्वीटनंतर पाकिस्तानी अभिनेत्री अर्मीना खानने प्रियांकावर टीका केली.

अभिनेत्री प्रियांका चोप्रानं भारतीय वायूदलाचं  ट्वीटमधून कौतुक केलं.

Jai Hind #IndianArmedForces असं प्रियांकाचं ट्वीट होतं.

पाकिस्तानी अभिनेत्री अर्मीना खानने प्रियांकाच्या या ट्वीटवर टीका केली.


प्रियांकाचं ट्वीट रीट्वीट करत अर्मीना म्हणाली,की “तू तर युनीसेफची गुड विल अम्बेसिडर आहे”.

“या ट्वीटचा स्क्रीनशॉट घ्या आणि जेव्हा प्रियांका अमन आणि शांतीबद्धल बोलेल,तेव्हा तिला या ट्वीटची आठवण करून द्या”, असेही अर्मीना म्हणाली.

प्रियांका युद्धाला पाठिंबा देते, त्यामुळे अर्मीना प्रियांकाला “खोटारडी” असेही म्हणाली.

काहींच्या मते, प्रियांकाच्या या ट्वीटनंतर युनीसेफ तिला गुड विल अम्बेसिडर म्हणून काढतील.

पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असताना पाकिस्तानी कलाकार भारत विरोधी पोस्ट शेअर करत आहे.

यात बिगबॉस सिझन 4 मध्ये स्पर्धक असलेली वीणा मलिक सर्वात पुढे आहे.

ती नेहमी ट्वीट करून भारतीय लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिथवण्याचा प्रयत्न करते.

 

 

 

 

 

Exit mobile version