Thu. Jun 20th, 2019

पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच – सुधीर मुनगंटीवार

0Shares

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झाली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात युतीचे 41 खासदार आहेत. त्यामुळे यंदाही भाजपाचाच मुख्यमंत्री असेल असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ?

पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या बैठकीत सुद्धा भाजपाचाच मुख्यमंत्री बनवण्यासाठी कामाला लागा असे आदेश दिले आहेत.

यामुळे शिवसेना नाराज झाली नाही ना ? प्रश्न विचारल्यावर शिवसेना नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजपाने घेतलेल्या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भाजपाचाच असावा असे स्पष्ट केले आहे.

तसेच महाराष्ट्राची जबाबदारी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे म्हटलं आहे.

भाजपाच्या या निर्णयामुळे शिवसेना नाराज झाल्याची चर्चा होत आहे.

मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना नाराज नसल्याचे म्हटलं आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुका होई पर्यंत काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: