Sun. Aug 18th, 2019

देशभरात 4 ठिकाणी NIA चे छापे

0Shares

आयएसआय या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) छापे टाकत आहे. हैद्राबादमध्ये तीन तर वर्ध्यात एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. वर्ध्यातून अब्दुल बसिथच्या दुसऱ्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. अब्दुल बसिथला 2018 मध्ये हैद्राबादमध्ये आयएसआयचा प्रसार करत असल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेली आहे. पुलवामा हल्यावेळी बसिथच्या पत्नीचा पाकिस्तानशी संपर्क असल्याची ही माहीती देण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) छापे टाकत आहे.

आयएसआय या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून हे छापे टाकण्यात येत आहेत.

हैद्राबादमध्ये तीन तर वर्ध्यात एका ठिकाणी छापा टाकण्यात आल्याची माहीती मिळाली आहे.

या छाप्यादरम्यान  वर्ध्यातून अब्दुल बसिथच्या दुसऱ्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे.

अब्दुल बसिथला 2018 मध्ये हैद्राबादमध्ये आयएसआयचा प्रसार करत असल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेली आहे.

पुलवामा हल्यावेळी बसिथच्या पत्नीचा पाकिस्तानशी संपर्क असल्याची ही माहीती देण्यात आली आहे.

पथकाने या चार ठिकाणी झाडाझडती घेतली असून या कारवाईबाबत एनआयएने अधिकृत माहिती दिलेली नाही.

या छाप्यांबद्दल एनआयएने गोपनीयता बाळगली असून याबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही.

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *