Tue. Jun 28th, 2022

चैन्नईमध्ये अभिनेत्रीच्या नावाचे मंदिर स्थापण करण्यात आले

अभिनेत्री निधी अग्रवाल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. निधी अग्रवाल हिच्या चाहत्याने चक्क तिचे मंदिर बांधले आहे. या संदर्भातील माहिती निधीला सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांनी दिली असू हे मंदिर चेन्नईमध्ये स्थित आहे. निधी अग्रवाल नेमकी कोण? आहे असा प्रश्न अनेकाला पडला असणार निधी अग्रवाल ही तामिळ आणि तेलगु चित्रपटात काम करत असून हीचे अनेक चाहते आहे.

निधीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली आहे. ‘त्यांनी मला सांगितले की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझ्यासाठी ही खास भेट आहे. ते ऐकून मी हैराण झाले. मी असा कधी विचार पण केला नव्हता. पण मी खूप आनंदी आहे आणि ते माझ्यावर इतकं प्रेम करतात त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे’ असं निधीने म्हटलं. हे मंदिर कुठे बांधलं आहे. याबाबत निधीला माहिती नव्हती. तिने हे मंदिर चैन्नईमध्ये असल्याचे म्हटलं आहे. निधीने तामिळमध्ये दोन चित्रपट केलं असून तेलुगूमध्ये काही चित्रपटांमध्ये काम केले आहेत. यापूर्वी तामिळनाडूमध्ये चाहत्यांनी अनेक कलाकारांची मंदिरे बांधली आहेत. ज्यामध्ये एमजीआर, खुशबू सुंदर, हंसिका मोटवानी आणि नयनतारा अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

निधीने २०१७मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर बॉलिवूडमधील ‘मुन्ना माइकल’ या चित्रपटात काम केले. २०१८ आणि २०१९मध्ये काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये ‘सव्यसाची’, ‘मिस्टर मजनू’, ‘आईस्मार्ट शंकर’ या चित्रपटात काम केलं. आता निधीचे ‘भूमि’ आणि ‘पूनगोडी’ हे तामिळ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.